आज मी जो गजानन माऊलींचा आम्हाला आलेला अनुभव सांगणार आहे, तो आहे २००९ सालचा | अपर्णा उंडे, चिंचवड
नमस्कार..
आज मी जो गजानन माऊलींचा आम्हाला आलेला अनुभव सांगणार आहे, तो आहे २००९ सालचा.
आम्ही गेली अनेक वर्ष दिवाळीत पाडव्याच्या दिवशी शेगावला माऊलींच्या संनिध्यात दिवाळी करतो.त्याही वेळी शेगावी जायचे ठरले होते आणि भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी विनायकी चतुर्थी येत होती.मनात इच्छा झाली,माझ्या सहस्त्र मोदक नैवेद्यासाठी करून न्यावेत
हेही वाचा - गजानन महाराज अनुभव | Gajanan maharaj anubhav
झाले विचार माझ्या यजमानांच्या जवळ बोलून दाखवला त्यांनीही आनंदाने होकार दिला.तळणीचे मोदक करायचे ठरले
दिवाळीचे फराळाचे ४दिवस आधी केले,आणि दिवाळीचे ४दिवस आम्ही उभयता केवळ मोदक करत होतो.खूप आनंद होत होता.मोदक करून झाले,आणि आम्ही पाडवा भाउबिज पुण्यात करून,चतुर्थीला शेगाव साठी निघालो..
नवीन कार घेतली होती,आणि तिच्यात प्रथम बसून मी केवळ माझ्या गजानन माऊलींचे दर्शन आधी करून मगच इतर कुठे जायचे आमचे ठरले होते.सासू सासरे ही आमच्यासोबत निघाले
शेगावला पोहोचे पर्यंत संध्याकाळ झाली होती,मनाची उलघाल होत होती,नैवेद्य वेळेत पोहोचायला हवा...माझे स्वामी वाट पहात असतील!कारण मी मोदक घेऊन येते आहे असे सांगून माझ्या भाकेत त्यांना अडकवून ठेवले होते..काहीही झाले तरी नैवेद्य वेळेतच जायला हवा होता.
आम्ही शेगावमधे पोहोचलो आणि आधी थेट दर्शनाला गेलो,..मंदिराजवळ तुफान गर्दी शेतकरी नेते शरद जोशी यांचा काहीं कार्यक्रम होता आणि त्यामुळे खूप गर्दी होती.आम्ही मंदिराच्या रस्त्याला गाडी घातली,पार्किंग मिळेना,माझी उलघाल अजुन वाढू लागली...माउली..मी आले आहे,नैवेद्य लवकर घेऊन तुमच्या दर्शनाला पोहोचू देत अशी प्रार्थना केली.
आम्ही पार्किंगसाठी जागा शोधत होतो,तितक्यात एक मुलगा पळत पळत आला आणि म्हणाला माझ्या मागे या,आहे पार्किंग
तो मुसलमान होता.आम्ही त्याच्यामागे गल्लीत गाडी वळवली आणि अचानक लाईट गेले,एकदम मिट्ट काळोख आणि गाडी वळत असताना कडेचा खड्डा दिसलाच नाही आणि गाडीचे डाव्या बाजूचे पुढचे चाक गटार वजा खड्ड्यात गेले आम्ही धाडकन अदळलो..! कशीतरी गाडी बाहेर काढली आणि पार्किंग ला लावली काहीतरी अडकत होते आणि खडखड वाजत होते,गाडी बिघडली होती.पण तिच्याकडे बघत बसायची इच्छाच नव्हती,मन माउली जवळ कधीच जाऊन पोहोचले होते,डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या होत्या, मला वेळेत नैवेद्य द्यायचं होता .आमच्या भोवती सर्व मुस्लीम लोक गोळा झाले,मला थोडीशी भीती वाटली,पण ते म्हणाले ताई घाबरु नका,गाडी आणि सामानाची चिंता करू नका(समान गाडीवर करिअर ल बांधले होते आणि डिकीत नैवेद्याची मोदकाची खोकी होती) माऊलीचे दर्शन करून नैवेद्य अर्पण करून या..!खूप आधार वाटला,आम्ही दर्शनाला गेलो खूप गर्दी होती,पण हातातील मोठी खोकी पाहून सेवेकरी लोकांनी खूप मदत केली आणि स्वामींना आरतीच्या वेळी नैवेद्य पोहोचला..!छान दर्शन झाले,बाहेर आलो..रहायला जागाच मिळेना,संस्थांच्या खोल्याही फुल्ल होत्या,गर्दीच प्रचंड होती.अकोल्यात आमची नणंद असते तिकडे जाऊ असे ठरले होते,पण गाडी जागची हलेनाच,खडखड आवाज खूपच येत होता,रूम शोधत होतो,पण मिळत नव्हती,शेवटी कशीतरी रूम मिळाली,आणि सासू सासरे आम्ही सर्व तिकडे गेलो जेवण केले
ह्यांना गाडीची काळजी लागली होती,सर्व दुकाने बंद आणि दुसऱ्या दिवशीचा लाड कारंजा दर्शन प्रोग्राम ठरलेला होता.. tata ची २४*७सर्व्हिस वरून एक नंबर मिळाला,पण जवळपास रात्रीचे ११वाजले होते दुसऱ्या दिवशी सकाळी १०शिवाय काहीही शक्य नव्हते..मी हताश झाले होते काय करावे सुचत नव्हते
आणि फोन आला की मी मेकॅनिक आहे आणि अलो आहे शेगाव ला तुम्ही गाडी जवळ या.मला भीती वाटली कारण गाडी जिथे होती तो भागही रात्रीच्या दृष्टीने वाईटच, हे एकटे .कोणी काही केलं तर?.मला येऊ देईनात सोबत.शेवटी मी माऊलींचे नामस्मरण करत बसून राहिले,सासू सासरे ही चिंतित झाले होते.प्रसंग गंभीर होता.
पण गजानन माउली त्यांच्या सोबत होते,हे माझ्या लक्षातच आले नव्हते,हे खाली गेले मेकॅनिक ने गाडी पाहीली,पुढचा भाग चेपला होता आणि तो टायर ला घासत होता त्याने १५मिनिटात गाडी नीट केली,आणि काहीही मोबदला न घेता आला तसा अकोल्याला निघून गेला.
हे रूमवर आले तेव्हा रात्रीचे १२वाजून गेले होते.यांनी आल्यावर मला सर्व हकीकत सविस्तर सांगितली.
विशेष म्हणजे गाडी नीट करणारा ही मुसलमान च होता.
त्याच्या रूपात माझे मा आले होते आणि आमची मदत केली होती.
पहाटे उठून आधी दर्शनासाठी धावलो परत..!!!
आणि मग तिथून निघून ठरल्याप्रमाणे लाड कारंजा येथे पूजन करून मग घरी सुखरूप पोहोचलो.
- अपर्णा उंडे, चिंचवड