गजानन महाराज अनुभव | Gajanan maharaj anubhav

 

माझी गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा व भक्ती आहे काल दि.17 नोव्हें.2020 माझा अनुभव मला आपल्या सोबत share करावासा वाटला म्हणून हा लेखन प्रपंच.....



काल माझे मित्र अचानक दुपारी 12 वाजे दरम्यान घरी आले आंणि दर्शना साठी शेगाव जाऊ असे म्हटले मी म्हटल ठीक आहे जाऊ पण माझ्या कडे दर्शनाची epass नाही  मी बाहेरूनच कळस दर्शन घेईल... ..आणि  जेवण करुन निघण्याचे ठरले........ परत कधी पर्यंत पोहोचणार एखाद वेळी घरी यायला ऊशीर होईल म्हणून माझा संध्याकाळचा डबा सोबत घेतला कारण मला पथ्य असल्यामुळे मी माझी millets ची भाकर आंणि त्यावर मस्त पैकी ठेचा घेतला .... मी काही दिवसांपूर्वी अनेक WhatsApp message वाचले होते त्या मधे भक्तांचा प्रसाद गजानन महाराजांनी कसा घेतला याचे भक्तांना आलेले अनुभव वाचले मनात विचार महाराजांनी एखाद्या वेळेस माझीही भाकर खावी कारण माझ्या मित्रांनी महाराजांसाठी बेसन भाकरी चा प्रसाद सोबत घेतला होता डोक्यात सारखा तोच विचार महाराज माझीही भाकर खातील का........दुपारी 3 वा.पोहचलो मी कळस दर्शन घेतले मित्रांनी आणलेला प्रसाद मंदिरात नेता येणार नव्हता मग तो बाहेर दोन्ही हात नसलेल्या गरजु व्यक्ती ला माझ्या मीत्रांनी दिला....त्यांनी दर्शन घेतले व परत निघलो.........6-7 वा.निघलो घरी जायला वेळ होईल भुक ही लागली म्हणून जेवण करण्यासाठी धाब्यावर  थांबलो....डबे काढले आणि आश्चर्य त्यात माझी ठेचा भाकर नव्हती माझ्या एकदम शहारे आले महाराजांनी तर माझी भाकर खाल्ली नसेल पण कस शक्य आहे ...मी मित्रांना म्हटल गाडी मधे परत बघु तर माझा डबा नव्हता .....मग माझा मित्र म्हटला मघा आम्ही महाराजांसाठी आणलेली बेसन भाकरी समजुन तुमची ठेचा भाकर त्या दोन्ही हात नसलेल्या गरजू व्यक्ती ला दिल्या गेली तर नसेल आणि मी एकदम आश्चर्यचकित झालो कारण महाराजांनी माझा ठेचा भाकरीचा प्रसाद घेतला होता....🙏

🙏जय गजानन🙏


जयंत वानखेडे,

शिवाजी नगर,मेहकर.

9860049133

9604222933

मला आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव | सौ. रेखा प्रकाश मोहरीर. | Gajanan maharaj anubhav