माझ्या मनाला सुखावुन टाकणारा अनुभव | सुनिता बडवे,औरंगाबाद

माझ्या मनाला सुखावुन टाकणारा अनुभव.
gajanan maharaj anubhav




एक मनात ध्यास होता सलग पारायन करण्याचा.....
त्यानुसार मी म्हणजे गजानन महाराजांनीच रोज सलग एकवीस पारायन करून घेतले.
आणि संजिवनी समाधी पारायण उपक्रमात भाग घेतल्याामुळे एक असे एकुण 22 पारायन झाली.
Gajanan maharaj anubhav
ऋषीपंचमीला मी उकडिचे मोदक नैवेद्यासाठी करायचे ठरवले.
उकडिच्या मोदकाचा मला तसा काही अंदाज येत नाही कि एवढ्या पीठात एवढे मोदक होतात.
त्यामुळे नेहमी मी जेवढे मोदक होतील तेवढ्याचा नैवेद्य अर्पन करते.
ह्यावेळेसही घरात जेवढे पीठ शील्लक होते तेवढे मी घेतले. सारणही अंदाजेच केले. आणि काय आश्चर्य त्या सारणात आणि पीठात माझे 22 मोदक झाले.
मला खुप आश्चर्य वाटले कि तंतोतंत सारण आणि पीठ कसे काय झाले.......
२१ मोदक झाले हाच आनंद होता.
पण नंतर विचार केला......
मोदक 22 कसे झाले? 
आणि नंतर लक्षात आले,,,,,
आपण २२ पारायने केली ती त्याने स्वीकारली ह्याचीच ही पावती होती.

ह्या अनुभवाने खुप,खुप आनंद झाला.
आणि लगेच दुसरा अनुभव.
माझा मुलगा आत्ताच मेकँनिकल ईंजीनियर झाला.सुरूवातीलाच त्याला गुजरातला नौकरी मिळाली होती. 
आम्हिही एक्सपीरीयन्स साठी त्याला जाऊ दिले. 
पण कोरोनामुळे तो त्याच्याच कृपेने सुखरूप ईथे आला.
त्यामुळे परत त्याला तीकडे पाठवण्याची आमची ईच्छा नव्हती.

तो ईकडेच पुण्यात प्रयत्न करत होता.
आणि ह्या पारायनाचे फळ म्हणुन की काय त्याला काल चांगल्या कंपनीत, अपेक्षेपेक्षा जास्त पँकेज असलेली नौकरी मिळाली.

पारायने सुफळ ,संपुर्ण झाली.
खरं तर देवा तुझी कृपा घननीळ आमच्यावर सतत बरसतच असते.
पण अशा अनुभवांच्या माध्यमातुन डोळे भरून येतात.अष्टभाव दाटुन येतात.

हा जन्म अपुरा देवा,
तुला भजण्यासाठी...
तुझ्या नामात रंगावे,
हिच आमची आटाटि...

सुनिता बडवे.
औरंगाबाद.
9405003356
🙏🙏🙏🙏🙏🙏