मीं अश्लेषा काळे | भरपूर दिवसांपासून मला अनुभव लिहायचा होता, आज मला आलेला महारांजांचा अनुभव सांगते.
April 28, 2021
अनुभव वाचण्याआधी एक छोटीशी टीप : तुम्ही गजानन महाराजांचे भक्त असाल तरच खलील अनुभव वाचावा
मीं अश्लेषा काळे . माझ्या घरातील सर्व मंडळी गजानन महाराजांचे भक्त.
भरपूर दिवसांपासून मला अनुभव लिहायचा होता, आज मला आलेला महारांजांचा अनुभव सांगते.
ही गोष्ट आहे मी गरोदर असतानाची, मी परायांण जसे होईल तसे करायचे तेव्हा, पण अचानक मला सूचले की आपण 9 महिने महाराजांचे एकसारखे पारायण करावे. आणि त्यानुसार मी परायण करणे सुरु केले.
मग शेवटच्या काही महिन्यांमध्ये एकसारखे बसून परायण करणे अवघड होऊ लागले तरीही मी महाराजांनचे नाव घेत कसेबसे खाली बसूनच पारायण करायचे, आणि मग मला त्याचे फळ मिळाले. आपण सगळ्यांनी अध्यायात वाचलेच आहे किं प्रसुती ही स्त्री जातीला फ़ार कठिण असते.
मला डॉक्टरने सोनोग्राफी नुसार 18 नोव्हेंबर ही तारीख दिली होती, पण 18 तारीख येऊनही मला प्रसुती कळा आल्या नाहीत, अथवा प्रसुती होण्याची कुठलीच चिन्हे दिसत नव्हते म्हणून सी सेक्शन होईल या भीतीने मी शेवटी दवाखान्यात जायला निघाले, तेव्हा जाता जाता आई म्हणाली की तुझे अध्याय वाया जाणार नाहीत, आणि गजानन महाराज चा अंगारा देत म्हणाली की अंगाऱ्याचे पाणी पिताच तुला त्रास न होता लगेच बाळ होईल, फ़क्त महाराजांवर विश्वास ठेव, तुम्ही पुढे जा आम्ही लगेच तयारी करुन् येतो.
मग मी व पती दवाखान्यात गेलो, मि 5.15 ला भर्ती झाले, डॉक्टर म्हणाले की सकाळी किंवा रात्री पर्यंत प्रसुती होईल, आधी नॉर्मल साठी प्रयत्न करू मग नाही जमलेच तर सी सेक्शन करू, आणि बस 6.30 ला मला इंजेक्शन चढविले, आणि लगेच प्रसुती कळा सुरू झाल्या, आणि फ़क्त काही मिनिटांमध्ये मला सुन्दर गोजिर गोड बांळ झाल, म्हणजे 7 च्या आतच, आई, आजी आणि माझे वडिल दवाखान्यात पोहोचताच त्यांच्या हातात नर्स ने माझं बाळ दिल. हाच तो महाराजांचा चमत्कार 🙏🙏🙏!!
सगळे भावुक झाले, व मनोमन गजानन महाराजचे आभार मानू लागले.
असे लहान मोठे कित्येक अनुभव मला व घरातील इतर मंडळींना आलेले आहेत गजानन गुरूंचे 🙏
हें श्री गजानन गुरु आम्हा सर्व भक्तांवर अशीच कृपा राहूदे!!
जय गजानन 🙏गुरु गजानन🙏