श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४५

🚩⚜️🌹 श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४५ 🌹⚜️🚩
                    #श्री_विष्णु_सहस्रनाम_श्लोक_भावार्थ

                    ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः  ।
                    उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः  ।

🚩⚜️🌹 (४१६) ऋतुः :  - भगवान् श्रीविष्णु कालाचे आधिपती असल्याने तेचच ऋतुचेही संचालन करतात.

🚩⚜️🌹(४१७) सुदर्शनः :  - पूर्ण भक्तिमय अंतःकरण झाल्यास भक्तांना जो सुलभतेने दर्शन देतो तो सुदर्शन. किवा ज्याच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या सर्व लौकीक चिंता नाहीशा होतात तो.

🚩⚜️🌹 (४१८) कालः :  - जो प्रत्येक प्राणीमात्रांमधील गुण व अवगुण यांची गणना करतो व त्या प्रमाणे फलप्रदान करतो तो 'काल' श्रीविष्णु होय.[1] तसेच भगवत् गीतेत म्हटले आहे 'मी गणना करणारांमध्ये  काल आहे.[2] 'काल' ही मृत्यु देवतेची संज्ञा आहे. या दृष्टिने पाहता सर्व शत्रूना जो मृत्यू स्वरूपात प्रकट होतो तो काल भगवान् विष्णु होय.

🚩⚜️🌹 (४१९) परमेष्ठि :  - जो आपल्या अपार महिम्याचाही केंद्रस्थित आहे असा परमेष्ठि श्रीविष्णु. किवा जो हृदयाकाशामध्ये असल्याने अनुभवास अत्यंत सुलभ आहे तो.[3]

🚩⚜️🌹 (४२०) परिग्रहः :  - ग्रहण करणारा. आपल्या भक्तांनी दिलेली अगदी सामान्य वस्तू, एकादे पान फूलही जो अत्यंत [4] समाधानानें ग्रहण करतो तो. कांही टीकाकार ह्या संज्ञेचा विस्तारित अर्थ असा करतात की 'सर्व भक्तांचा जो एकमेव आश्रय आहे तो परिग्रह श्रीविष्णु होय.

🚩⚜️🌹 (४२१) उग्रः :  - भयकारी, जे अत्यंत निंदनीय व दुष्ट आहेत अशांच्या हृदयांत भीती निर्माण करतो तो उग्र[5] किवा उपनिषदांमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, ' ज्याच्या भीतीने अग्नि जळतो, ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशतो, ज्याच्या भीतीने इंद्र, वायु, मृत्यु आपापले कार्य करण्यास प्रवृत्त होतात तो श्रीमहाविष्णु उग्र आहे.

🚩⚜️🌹 (४२२) संवत्सरः :  - वर्ष. जो सर्व प्राणीमात्रांचे वस्तीस्थान आहे असा. कालाच्या विशिष्ठ विस्तारामध्ये प्राणी जगतात [6] आणि अनुभव ग्रहण करतात म्हणून तो संवत्सर- वर्ष आहे. (संवयति)

🚩⚜️🌹 (४२३) दक्षः :  - कार्यकुशल. जो ब्रह्मांडाच्या उत्पत्ति स्थिती लयाचे कार्य अत्यंत सहजतेने, कौशल्याने, मेहेनतीने व प्रतिज्ञापूर्वक करतो तो 'दक्ष' श्रीविष्णु.

🚩⚜️🌹 (४२४) विश्रामः :  - विश्रांतीचे स्थान, शांत अवस्था. ज्या अवस्थेमध्ये गेले असतां संसाराने त्रस्त झालेल्या व्यक्तिंना पूर्ण विश्रांतीचा लाभ होतो व शांतता वाटते ती सर्वश्रेष्ठ आत्मस्थिती म्हणजे 'श्रीनारायणच' होय.

🚩⚜️🌹 (४२५) विश्वदक्षिणः :  - जो अत्यंत कुशल असून तत्पर आहे असा. सर्व कार्य प्रवृत्त सजीवांच्या ठिकाणी असलेली कार्यप्रवृत्ती व कार्यकौशल्य हे त्याचेच प्रकटन आहे. कारण तोच ह्या सर्व कर्तृत्वाचा व कौशल्याचा उगम आहे. तोच या सर्व विश्वाचा कर्ता, पालनकर्ता व रक्षणकर्ता असल्याने अर्थातच सर्व प्राणीमात्रांचा अधिक्षक व नियंता आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
[1]   कलयति इति कालः ।
[2]   कालः कलयतामहम् ।
[3]   परमे व्योम्नि प्रतिष्ठितः । (कठोपनिषत्)
[4]  पत्रं पुष्पं फलं तोयं योमे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः  ।। (गीता ९-२६)
[5]  भयादस्याग्निस्तपति भयात्तपति सूर्यः  । भयादिन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावतिपंचमः  ।। (कठ २-५-३)
[6]  सम्यक् वसन्ति भूतानि यस्मिन् इति संवत्सरः  ।

क्रमशः.....
साभार.....🙏

श्लोक १

श्लोक २

श्लोक ३

श्लोक ४

श्लोक ५

श्लोक ६

श्लोक ७

श्लोक ८

श्लोक ९

श्लोक १०

श्लोक ११

श्लोक १२

श्लोक १३

श्लोक १४

श्लोक १५

श्लोक १६

श्लोक १७

श्लोक १८

श्लोक १९

श्लोक २०

श्लोक २१

श्लोक २२

श्लोक २३

श्लोक २४

श्लोक २५

श्लोक २६

श्लोक २७

श्लोक २८

श्लोक २९

श्लोक ३०

श्लोक ३१

श्लोक ३२

श्लोक ३३

श्लोक ३४

श्लोक ३५

श्लोक ३६

श्लोक ३७

श्लोक ३८

श्लोक ३९

श्लोक ४०

श्लोक ४१

श्लोक ४२

श्लोक ४३

श्लोक ४४

श्लोक ४६

श्लोक ४७

श्लोक ४८

श्लोक ४९

श्लोक ५०