श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४८

🚩⚜️🌹 श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४८ 🌹⚜️🚩 
                    #श्री_विष्णु_सहस्रनाम_श्लोक_भावार्थ

                   यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतु सत्रं संतांगतिः  ।
                   सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् ।।

🚩⚜️🌹 (४४५) यज्ञः :  - जो स्वतः यज्ञस्वरूप आहे असा व सर्व यज्ञ ज्याचे प्रकट स्वरूप आहेत असा. सर्व देव व मानवांना संतुष्ट करण्याकरतांच जो स्वतःच यज्ञस्वरूपाने प्रकट होतो तो श्रीविष्णु. म्हणून श्रुति म्हणतात ’सर्व यज्ञ विष्णुस्वरुप आहेत – यज्ञो वै विष्णुः ।

🚩⚜️🌹 (४४६) इज्यः :  - यज्ञामध्ये जो आवाहन करण्यास योग्य आहे असा. भगवान् नारायणाचे आवाहन सर्व यज्ञामध्ये केले जाते. जरी भक्तांनी अखाद्या विशिष्ठ देवतेचे आवाहन केले तरी ते त्या नारायणाचेच पूजन असते. तो स्वतः नित्य, अनंत असल्यानें सर्व देवता विभूतीरूपाने त्याचाच आविष्कार आहेत. म्हणून कोणत्याही देवतेचे पूजन हे त्या महाविष्णूचेच पूजन होते. हरिवंश पुराणांत हे सत्य उघड केले आहे की जे यज्ञामध्ये आपापल्या देवतांची अगर पितरांची पूजा करतात ते आत्मस्वरूपाने त्या परमात्मा श्रीविष्णुचीच पूजा करतात, म्हणून तोच 'इज्य' आहे.

🚩⚜️🌹 (४४७) महेज्यः :  - जो सर्वात पूजनीय आहे असा. ज्याला सर्व यज्ञांमध्ये आवाहन केले जाते तो आहे 'श्रीविष्णु' महेज्य. इतर देवतांना केलेल्या आवाहनाने त्या देवता त्यांचेच फल देऊ शकतात परंतु श्री नारायणास केलेले आवाहन असे सर्वसमर्थ आहे की त्याने भक्तास सर्वोच्च असे 'मोक्ष' रूपी फल प्राप्त होते. म्हणून तोच महायज्ञात पूजनीय महेज्य आहे.

🚩⚜️🌹 (४४८) ऋतुः :  - ज्या यज्ञामध्ये स्तंभ उभा करून त्याला बळी देण्याचा पशू बांधतात असा याग  ’क्रतु’ होय. सर्व यज्ञ हे श्रीविष्णुलाच अर्पण केले जातात त्यामुळे ज्यायज्ञामध्ये पशुहिंसा केली जाते असा हिंसात्मक यज्ञही त्यालाच अर्पण केला जातो. कारण तो स्वतःच क्रतु (यज्ञस्वरूपच) आहे.

🚩⚜️🌹 (४४९) सत्रम् :  - [1]जो चांगल्याचे रक्षण करतो तो. पूर्वीची संज्ञा क्रतु. त्याच्याच संदर्भाने पाहता एका विशिष्ठ तर्‍हेच्या यज्ञास 'सत्र' असे वैदिक वाङ्‌मयांत संबोधिले आहे.

🚩⚜️🌹 (४५०) सतांगतिः :  - सर्व सज्जनांचे गंतव्य (गति) आहे असा. जीवनातील सर्व तर्‍हेच्या बंधनातून मुक्ततेची इच्छा करणार्‍या साधकांकडून ज्याचे नेहमी पूजन व आवाहन केले जाते तो 'श्रीविष्णु'. संस्कृतमध्ये गति ह्या शद्बाने मार्ग व गंतव्य स्थानही निर्देशित केले जाते. म्हणून ज्याला शरण जाऊनच त्याचे पर्यंत पोहोचता येते तो नारायण 'सतांगति' आहे.

🚩⚜️🌹 (४५१) सर्वदर्शी :  - सर्वाचे ज्ञान असणारा. तो स्वतःच ज्ञानस्वरूप असल्यानें सर्व प्राणीमात्रांमधील सर्व प्रकारच्या ज्ञानाचे अधिष्ठान तोच आहे म्हणून तो सर्वदर्शी आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा या विश्वाचा चक्षु आहे त्याप्रमाणे तो परमात्मा सर्व ब्रह्मांडाचा चक्षु सर्व प्रकाशित करतो.

🚩⚜️🌹 (४५२) विमुक्तात्मा :  - नित्य मुक्त आत्मा. ते परमतत्व जरी साधनांमधून प्रकट होत असले तरी ज्या प्रकृतीच्या कोषांतून ते प्रकट होते, आपाततः स्वतःस व्यक्त करते, तरीही त्यामध्ये कधीच बद्ध होत नाही ज्याप्रमाणे लाट समुद्रात उत्पन्न होते, समुद्रावरच रहाते व त्यातच विरते त्याप्रमाणे अनुभवाची लाट चैतन्यावर उत्पन्न होते, त्याचेवरच विलास करते व चैतन्यातच विलय पावते. परंतु ते [2] चैतन्य सदैव मुक्तच असते ते कधीही स्थूलाने बद्ध होत नाही. श्रुतींनी म्हटल्याप्रमाणे तो परमतत्त्व परमात्मा श्रीनारायणच आहे.

🚩⚜️🌹 (४५३) सर्वज्ञ :  - सर्व ज्ञानी. तो चैतन्यस्वरूप - ज्ञानमय असल्यामुळेच सर्व मानवातील विचार, हेतु भावना, उद्देश व सर्व इंद्रिायांचे अनुभव तोच प्रकाशित करतो. सर्वदर्शी या संज्ञेशी समान अर्थाची ही संज्ञा आहे.

🚩⚜️🌹 (४५४) ज्ञानमुत्तमम् :  - सर्व ज्ञानामध्ये उत्तम ज्ञान. ते आत्मतत्त्व सर्वश्रेष्ठ ज्ञानस्वरूप आहे. त्याचेवाचून कुठलेही ज्ञान असू शकत नाही. तैतरीय उपनिषद म्हणत; 'ते बह्म सत्य ज्ञान अनंत आहे.'.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
[1]   या शब्दाची उकल अशी करता येते -  सतः त्रायते इति सत्रम्  ।
[2]    पुरमेकादशद्वारमजस्यावक्र चेतसः  । 
     अनुष्ठाय न शोचंति विमुक्तश्च विमुच्यते  ।। कठोपनिषत् २-१.

क्रमशः.....
साभार.....🙏

श्लोक १

श्लोक २

श्लोक ३

श्लोक ४

श्लोक ५

श्लोक ६

श्लोक ७

श्लोक ८

श्लोक ९

श्लोक १०

श्लोक ११

श्लोक १२

श्लोक १३

श्लोक १४

श्लोक १५

श्लोक १६

श्लोक १७

श्लोक १८

श्लोक १९

श्लोक २०

श्लोक २१

श्लोक २२

श्लोक २३

श्लोक २४

श्लोक २५

श्लोक २६

श्लोक २७

श्लोक २८

श्लोक २९

श्लोक ३०

श्लोक ३१

श्लोक ३२

श्लोक ३३

श्लोक ३४

श्लोक ३५

श्लोक ३६

श्लोक ३७

श्लोक ३८

श्लोक ३९

श्लोक ४०

श्लोक ४१

श्लोक ४२

श्लोक ४३

श्लोक ४४

श्लोक ४५

श्लोक ४६

श्लोक ४७

श्लोक ४९

श्लोक ५०